माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला करणारे ताब्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार शस्राने प्राणघातक हल्ला करणार्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी, भाजपाचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर शहरातील वीर सावरकर चौकात ८ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात झाला होता या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार करण्यात येत असल्याने पोलिसांनी औरंगाबाद येथे जाऊन पोलिसांनी त्यांचे जाबजबाब घेतल्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात जगदीश महाजन, मुलगा विशाल जगदीश महाजन आणि संजय घटी अशा तिघांवर कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या तिघांना अटक करण्यात आली आहे.