रेल्वे अँप्रेन्टीसशिपच्या परीक्षे संदर्भात रेल्वे मंत्री यांना आमदार भोळे यांचे पत्र !
जळगांव (प्रतिनिधी)। रेल्वे अँप्रेन्टीसशिपचा पेपर तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली या जिल्ह्यात दिनांक १८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या दरम्यान असून जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तिथे जाण्यासाठी सध्या तरी कोणतीही ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे अँप्रेन्टीसशिप परीक्षा देणाऱ्या विध्यार्थ्यांची चांगलीच फजीती होत आहे.
त्यामुळे त्यांनी जळगाव शहरातील आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांना विध्यार्थ्यांनी त्यांची अडचण सांगितल्या नंतर त्यावर तीन प्रकारे अडचण सोडली जाऊ शकते. १) परीक्षा ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे ची व्यवस्था करणे ते शक्य होत नसल्यास २) परीक्षा महाराष्ट्रातील विद्यार्थी साठी महाराष्ट्रातच घेण्यात यावी तेही शक्य होत नसल्यास ३) काही काळा साठी ( कोरोना संपेपर्यंत किव्हा रेल्वे सुरळीत सुरू होण्यापर्यंत ) परीक्षेला स्थगिती द्यावी अशे अँप्रेन्टीसशिप विद्यार्थी हर्षल देवरे यांनी आमदार श्री.सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांच्या शी चर्चा करून केंद्र सरकारला निवेदना द्वारे कळविण्याची विनंती केली. त्याप्रमाणे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी विद्यार्थांची अडचण लक्षात घेऊन क्षणाचाही विलंब न लावता रेल्वे मंत्री श्री.पियुष गोयल यांना व भुसावळ विभागाचे प्रमुख श्री.गुप्ता यांना पत्र देऊन कळविले. आमदार सुरेश दामू भोळे यांनी महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील विद्यार्था प्रति दाखवलेल्या सहानुभूती मुळे समाजातील सर्व स्तरातून व अँप्रेन्टीसशिप विद्यार्था मधून कौतुक केले जात आहे .