भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

धक्कादायक : आमदाराच्या पीए ला भर चौकात बेदम मारहाण, सात जणांवर गुन्हा दाखल

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आमदाराच्या पीए ला भर चौकात अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बीड मधून हा धक्कादायक प्रकार समोर आला. आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहाय्यकाला भर चौकात अमानुष बेदम मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.

बीडच्या माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना माजलगाव शहरांतील रंगोली कॉर्नरवर भर चौकात बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार काल उघडकीस आला. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात आता अजय सिंह राऊत, अभय राऊत, अशोक बाळासाहेब सोळंके, मेघराज अर्जुन सोळंके, यांच्यासह इतर तीन जणांविरोधात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय प्रकरण आहे नेमकं ?
बीडमध्ये शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखावर प्राणघात हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आमदार प्रकाश सोळंके यांच्या स्वीय सहायकाला भररस्त्यात मारहाण झाली. मराठा आंदोलनादरम्यान माजलगावमध्ये जाळपोळ झाली होती. यामध्ये आमची नावं विनाकारण का गोवली? असा जाब विचारत आमदार सोळंके यांचे स्वीय सहायक महादू सोळंके यांना मारहाण करण्यात आली आहे. माजलगावातील रंगोली कॉर्नरवर हा हल्ला झाला. भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले अरूण राऊत यांचे पुतणे अजयसिंह राऊत यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘माझे नाव या जाळपोळीत विनाकारण का गोवले? माझ्यावर गुन्हा दाखल करतो का? मी जाळपोळीत होतो तरी का?’ असे म्हणत सलूनमध्ये शेवींग करत असलेल्या महादू सोळंकेंना बाहेर ओढत आणून मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे या मारहाणीचे मोबाईलवर चित्रिकरणही करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!