सर्वात मोठी बातमी : आता प्रीपेड ‘स्मार्ट मिटर’ घरगुती साठी नाही, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रीपेड स्मार्ट मीटर हे मोबाईल सारखं रिचार्ज करावं लागणार. रिचार्ज संपलं की घरातील वीज बंद होईल. हे मीटर लावायला सुरुवात होणार होती परंतु स्मार्ट मीटर च्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला होता.
‘स्मार्ट मिटर’ बसणार म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता दरम्यान जनभावना लक्षात घेता ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे जाहीर केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली आहे.
त्यामुळे आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी ते लावले जातील, असे स्पष्ट झाले.राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती त्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात २. १६ कोटी सर्वसामान्य ग्राहकांकडे बसवणार होते स्मार्ट वीज मीटर,तर २५.६ लाख औद्योगिक आणि मोठ्या ग्राहकांकडे बसविणार स्मार्ट मीटर.
चार कंपन्यांना दिले होते कंत्राट
स्मार्ट मीटर चे कंत्राट अदानी पॉवर,जिनस कंपनी, एनसिसी कंपनी, माँटोकाला या कंपन्यांना देण्यात आले होते.
आता मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेने सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर बसविले जाणार नाहीत.