कांग्रेस आणि ठाकरे गटाची स्वबळाची तयारी? विधानसभेच्या प्रत्येकी २८८ जागा लढविणार?
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची २८८ जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचे सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे केले. महाराष्ट्रात आम्ही सगळीकडे विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे नाना पटोले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये २८८ जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचे सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केले आहे.
नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा पिंजून काढण्याचा सपाटा लावला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचे नव्हे तर महाराष्ट्रातील २८८ जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचे वक्तव्य केले.
एका बाजुला काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असतानाच दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक २८८ जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत २८८ जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावरुन महाविकास आघाडीमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण देखील पाहायला मिळालं होते.बआगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट राहते की कांग्रेस व ठाकरे गट प्रत्येकी २८८ जागा लढऊन वेगवेगळी चूल मांडतात काय ? हे पाहावे लागेल.