ब्रेकिंग: रावेरमध्ये मतमोजणी थांबवली; महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा ईव्हीएम मशिनवर आक्षेप
जळगाव, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि : रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत मतमोजणी थांबवली आहे. मतदान यंत्र एवढ्या दिवसापासून ठेवून देखील त्यांची बॅटरी 99% कशी आहे अशी शंका राष्ट्रवादी (शरद पवार) गटाने व्यक्त केली आहे. ज्या मतदान यंत्राचे बॅटरी 99% आहे त्या मतदान यंत्रात भाजपला आघाडी मिळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी केला आहे.