भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यक्राईममहाराष्ट्र

२० वर्षीय महिलेवर क्वारंटाईन सेंटरमध्ये बलात्कार; पीडितेच्या पतीकडुन घटस्फोट !

मुंबई (वृत्तसंस्था)। मीरा-भाईंदर महापालिकेच्या एका क्वारंटाईन सेंटरमध्ये २० वर्षीय महिलेवर तीन महिन्यांपूर्वी चार दिवस महापालिकेच्याच ठेका पद्धतीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर महिलेचा घटस्फोट झाला. विक्रम शेरे (२७) असे आरोपीचे नाव असून तो महापालिकेत ठेका पध्दतीवर सैनिक सिक्युरिटी एजन्सीमार्फत काम करतो.

महापालिकेच्या गोल्डन नेस्ट परिसरातील क्वारंटाईन सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक असलेला विक्रम शेरे संशयित रुग्णांना रात्री दूध आणि गरम पाणी देण्याचे काम करीत होता. त्या संधीचा फायदा उचलत त्याने याठिकाणी दाखल असलेल्या वीस वर्षीय तरुणीवर २ जून ते ५ जून दरम्यान वारंवार बलात्कार केला. हा प्रकार कुठे सांगितला तर जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. मात्र, ती गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेमुळे पीडितेचा घटस्फोटही झाला.

पीडितेच्या घरातील एक ३२ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने घरातील सात जणांना ३१ मेला क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यावेळी पीडित महिला आपल्या ७ महिन्यांच्या मुलीसह क्वारंटाईन सेंटरमधील रुम नं. १०७ मध्ये ५ जूनपर्यंत होती. विक्रम त्याचवेळी याठिकाणी रात्री दूध आणि गरम पाणी देण्याचे काम करीत असे. त्याने २ जून ते ५ जूनपर्यंत धमक्या देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार महिलेने नवघर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून विक्रमला अटक केली. ही अतिशय गंभीर घटना आहे. त्यामुळे या प्रकरणात महापालिका अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. भाजप कडुन क्वारंटाईन सेंटरमध्ये यशोपी समिती नेमा अशी गेल्या अनेक महिन्यांपासून मागणी करीत आहे. पण, त्यावर अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!