भारत देशाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी व्हा
जळगाव, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। मित्र हो,भारत सरकारच्या योजना सर्वसामान्य सर्व नागरिक, विद्यार्थी , शेतकरी नोकरदार व इतर यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम आहे. जळगाव जिल्ह्यासाठी डिजिटल इंडिया वीक 2023 नोंदणी साठी खूप चांगला प्रतिसाद आपण सर्वांकडून मिळत असून जास्तीत जास्त नागरिकांनी ही नोंदणी करावी असे आवाहन “एनआयसी” चे वरीष्ठ अधिकारी प्रविण चापडे यांनी केली आहे.
भारत सरकारच्या सर्व प्रकारच्या योजना हया जानते पर्यन्त पोहचवण्याचे काम “डिजिटल इंडिया वीक 2023” द्वारे नोंदणी सुरू आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी न केलेल्यानी आपले स्वतःचे, कुटुंब, मित्र, शेजारी, शेतकरी मित्र, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, सरकारी/निमसरकारी/ निजी कर्मचारी, व इतर सन्माननीय नागरिक यांची नोंदणी करून घ्यावी.
फक्त 1 मिनिट लागतो . नाव आणि मोबाईल नंबर टाकायचे, राज्य व जळगाव निवडायचे व नोंदणी पूर्ण करा. ई-मेल हा ऑपशनल आहे. नोंदणी संपूर्णपणे मोफत आहे. नोदणी खालील दिलेली लिंक वर जाऊन करायची आहे. 👇
https://www.nic.in/diw2023-reg/