चिंताजनक ; जळगाव जिल्ह्यात आज ३७४ रुग्ण कोरोना बाधित
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ३७४ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहे. तर दुसरीकडे ४६८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आजची रुग्ण संख्या-
जळगाव शहर – ४१, जळगाव ग्रामीण-१६, भुसावळ-४५, अमळनेर-४३, चोपडा-७९, पाचोरा-१५, भडगाव-१५, धरणगाव-००, यावल-३१, एरंडोल-०१, जामनेर-०८, रावेर-१०, पारोळा-०६, चाळीसगाव-५८, मुक्ताईनगर-०१, बोदवड-००, इतर जिल्ह्यातील-०५ असे एकुण ३७४ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या १ लाख ४९ हजार ७११ पर्यंत पोहचली असून १ लाख ४३ हजार ६५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत २५८५ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ३४६७ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.