भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

ब्रेकिंग | मुक्ताईनगरातील अवैध गुटखा वाहतूक पुन्हा चव्हाट्यावर; लाखोंचा गुटखा जप्त !

मुक्ताईनगर-मंडे टू मंडे न्युज, अक्षय काठोके | तालुक्यातील अवैध गुटखा वाहतुकीसह विक्री होत असल्याची मोठी चर्चा असताना आ. एकनाथ खडसे यांनी तर बऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्यांकडून पोलीसांना १५ लाखांचा हप्ता दिला जात असल्याचा आरोप ‘मंडे टू मंडे न्युज’ शी मुलाखतीत बोलताना केला होता. आता तर दस्तुरखुद्द प्रवर्तन चौकात गुटख्याची गाडी बंद पडल्याचे भांडा फोड झाला असून पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरातून वाहतूक होत असल्याचे दिसून आले आहे. आज रात्री चोरीचा गुटखा पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसर, आज रात्री आठ वाजेच्या सुमारास मुक्ताईनर शहरातील प्रमुख चौक असणार्‍या प्रवर्तन चौकात मध्यप्रदेश राज्यातून बऱ्हाणपूर येथून अवैध गुटखा विक्रीसाठी गाडी पूर्णाड मार्गे महाराष्ट्रात मुक्ताईनगरात येत होती सदरील अवैध गुटखा वाहतुकीची गाडीत राज्यात प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटख्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला. जळगांव अन्नसुरक्षा अधिकारी आर. एम. भरकड व सहाय्यक आयुक्त अधिकारी अन्न औषध प्रशासन जळगाव संतोष कांबळे यांनी ही गाडी पकडली आहे. पथकाने गुटख्याचा साठा जप्त केला असून कारवाईस सुरवात केली आहे. या कारवाईत नेमका किती साठा जप्त करण्यात आला याची माहिती मिळाली नसली तरी हा आकडा मोठा असण्याची शक्यता दिसून आली आहे.

आमदार एकनाथराव खडसे यांनी आजच विधानपरिषदेत मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याबाबत विधानपरिषदे लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला होता. यात त्यांनी प्रामुख्याने मध्यप्रदेशातून गुटखा मोठ्या प्रमाणात मुक्ताईनगर तालुक्यासह जिल्ह्यात येत असून यातून करोडो रूपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप केला होता. यानंतर काही तासांमध्येच ही कारवाई करण्यात आल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याने कारवाईचा तपशील अद्याप समजला नाही.

या संदर्भात मंडे टू मंडे न्यूजचे प्रस्तुत प्रतिनिधीनी आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतली. यावर ते म्हणाले की, आज मुक्ताईनगरात मोठी कारवाई झाली असली तरी हे तर फक्त हिमनगाचे टोक आहे. या प्रकरणातील आरोपी हा एका बड्या पुढार्‍याचा जवळचा व्यक्ती असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. मुक्ताईनगरसह जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताने गुटखा तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून याचबाबत मी आज विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केला. यानंतर मी याच संदर्भात जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी बोललो. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!