क्रिटीकल शस्त्रक्रिये साठी एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात, वकिलांची कोर्टात माहिती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई ,वृत्तसंस्था। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकनाथ खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. एकनाथ खडसेंना पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणात ईडीकडून समन्स धाडण्यात आले आहे. तसेच मुंबई सेशन कोर्टात एकनाथ खडसे अनुपस्थित राहिले आहेत. यावेळी खडसेंच्या वकिलांनी कोर्टात माहिती दिली आहे. खडसेंना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या माहितीवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी टीका केली आहे. एकनाथ खडसे खोटं बोलून गैरहजर राहिल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे.
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्यावर भोसरी भूखंड प्रकरणात ईडी चौकशी सुरु आहे. याप्रकरणी खडसे मुंबई सेशन कोर्टात अनुपस्थित राहिले आहेत. वकिलांनी खडसे आजारी असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे कारण सांगितले आहे. खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे. खडेंना ईडीने समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु खडसे गैरहजर राहिले असून वकिलांनी याबाबत ईडीला पत्र दिले आहे.
एकनाथ खडसे कोर्टात गैरहजर राहण्यासाठी खोटं बोलत आहेत. खडसे खोट्यावर खोटं बोलत असल्याचे आश्चर्यकारक आहे. सेशन कोर्टात गैरहजेरीबाबत खडसेंच्या वकिलांनी सांगितले की, खडसेंवर क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु ते खोटं बोलत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
दुसरीकडे एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी ईडीकडून चार्जशीट दाखल करण्यात आलं आहे. त्यात खडसे आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी या दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत. हे सर्व 2016 चं प्रकरण असून त्यावेळी एकनाथ खडसे महसूल मंत्री होते. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी सध्या याच प्रकरणात अटकेत आहेत.