राज्यात १ एप्रिल पासून कोरोना निर्बंध मुक्ती
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। : राज्यात गुढीपाडव्याआधीच नागरिकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. कारण, १ एप्रिल पासून राज्यात करोनाचे सर्व निर्बंध हटवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून देण्यात आली आहे.
डॉ. राजेश टोपे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. टोपे म्हणाले की, “राज्यात १ एप्रिल पासून कोरोना निर्बंध मुक्ती होणार आहे. कोरोनाच्या साथीच्या दरम्यान राज्यात लागू करण्यात आलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा मागे घेण्यात येणार आहे. त्यामुळे जनतेवर आलेले निर्बंध देखील हटणार आहेत. या काळात मात्र, लोकांनी मास्कचा नियमित वापर करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.