भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

रामभक्तांसाठी अयोध्येकडे धावणार ‘आस्था’ ट्रेन,महाराष्ट्रातुन कुठून जाणार ट्रेन

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अयोध्येमध्ये २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनानंतर देशातील सामान्य जनतेला श्री रामाचं दर्शन घेता यावं यासाठी भारतीय रेल्वे ‘आस्था’ ही विशेष ट्रेन चालवणार आहे. या रेल्वे गाड्या देशभरातील ६६ वेगवेगळ्या ठिकाणांना अयोध्येशी जोडल्या जाणार आहेत. राम मंदिराला भेट देण्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक ट्रेनमध्ये २२ डबे असतील. भाविकांच्या मागणीनुसार गाड्यांची संख्या नंतर वाढवली जाणार आहे. नवी दिल्ली, जुनी दिल्ली, निजामुद्दीन आणि आनंद विहार येथून विशेष आस्था गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्ली व्यतिरिक्त आगरतळा, तिनसुकिया, बारमेर, कटरा, जम्मू, नाशिक, डेहराडून, भद्रक, खुर्द रोड, कोट्टायम, सिकंदराबाद, हैदराबाद आणि काझीपेठ येथूनही गाड्या धावतील.

तामिळनाडूमध्ये चेन्नई, सेलम आणि मदुराईसह नऊ स्थानकांवरून आस्था स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येणार आहे. या गाड्या महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई, वर्धा, जालना आणि नाशिक अशा एकूण सात स्थानकांवरून अयोध्येपर्यंत धावतील. सुमारे २०० विशेष गाड्या चालवण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे. राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानंतर १०० दिवस वेगवेगळ्या शहरांतून या गाड्या धावणार आहेत.

मराठवाड्यातून तीन रेल्वे सेवा उपलब्ध झाली आहे. १४ फेब्रुवारी नांदेड येथून नांदेड- आयोध्या (०७६३६) ही विशेष रेल्वे औरंगाबाद मार्गे धावणार आहे. नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, भुसावळ मार्गे ही रेल्वे अयोध्या येथे पोहचेल. तसेच परतीच्या प्रवासात १६ फेब्रुवारी रोजी अयोध्या येथून निघणार आहे. १८ फेब्रुवारी रोजी सिकंदराबाद – अयोध्या (०७२९७) ही रेल्वे नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खांडवा मार्गे अयोध्या येथे जाईल. २१ फेब्रुवारी रोजी या रेल्वेचा परतीचा प्रवास होईल.

त्याचप्रमाणे ४ फेब्रुवारी रोजी जालना – अयोध्या (०७६४९) ही रेल्वे परभणी, पूर्णा, नांदेड मार्गे धावणार आहे. ७ फेब्रुवारी रोजी ही रेल्वे अयोध्या ते जालना (०७६४९)  धावणार आहे. अयोध्यासाठी मराठवाड्यातून तीन रेल्वे गाड्या धावणार असल्याने राम भक्तांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे.

महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या गाड्या

मुंबई-अयोध्या-मुंबई

नागपूर-अयोध्या-नागपूर

पुणे-अयोध्या-पुणे

वर्धा-अयोध्या-वर्धा

जालना-अयोध्या-जालना

सुरक्षेच्या कारणास्तव, रेल्वेने आपल्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS) मध्ये ट्रेनच्या तपशीलांचा उल्लेख न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विशेष आस्था गाड्यांची राउंड-ट्रिप तिकिटे IRCTC वेबसाइट आणि अॅपवर बुक केली जाऊ शकतात.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!