भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

महागाई भडकली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ, कमर्शियल सिलेंडरच्या दरातही मोठी वाढ

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आज सकाळीच घरगुती आणि कमर्शियल सिलिंडरचे दर महागले आहेत. होळी आधीच देशभरातील जनतेचा रंगाचा बेरंग झाला आहे.घरगुती गॅस सिलिंडरचे दर ५० रुपयाने महागले आहेत. तर कमर्शियल गॅस सिलिंडर ३५० रुपयांनी महागला आहे. महागाईने आधीच सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं असतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने सर्व सामान्यांना आणखी एक झटका बसला आहे. त्यामुळे सांगा कसे जगायचे? असा सवाल सामान्यांकडून होत आहे. तर महिन्याचं बजेट लावता लावता गृहिणींच्या नाकीनऊ येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १९ किलोवाल्या एलपीजी सिलिंडरची किंमत ३५०.५० रुपयाने वाढली आहे. त्यामुळे दिल्लीत १९ किलो गॅस सिलिंडर आता २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती गॅस सिलिंडर ११०३ रुपयांना मिळणार आहे. नवीन दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे. लोकल टॅक्समुळे घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एका राज्यापेक्षा वेगळी असते. फ्यूल रिटेलर्स दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत सुधारणा करत असतात.

ओएमसीने गेल्यावर्षी ६ जुलै रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली होती. सिलिंडरच्या किंमतीत १५३.५ रुपयांची वाढ झाली होती. गेल्या वर्षी चार वेळा गॅसचे दर वाढवण्यात आले होते. ओएमसीने पहिल्यांदा मार्च २०२२ मध्ये ५० रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर मे मध्ये ५० रुपये आणि ३.५० रुपयांची वाढ केली होती. जुलैमध्येही घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ केली होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!