Monsoon : मान्सून लांबला…..बघा नवी तारीख
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या आठवड्यात मान्सूनचा प्रवास सुरु झाला आणि अंदनामातून आनंदवार्ता कानांवर आली. तिथे केरळात मान्सूनच्या येण्यापूर्वीच पावसानं धुमाकूळ घातला आणि या वरुणराजाला पाहून सर्वांनाच धडकीही भरली, आता महाराष्ट्रातही मान्सून ठरलेल्या वेळेतच दाखल होणार याची सर्वांना खात्री पटली असताना मात्र आता काही वेगळंच चित्र समोर येत आहे. कारण मान्सून, अरबी समुद्रात दाखल झाला असला तरी तो तिथंच थांबला.
- रावेर मधून महायुतीचे अमोल जावळे ४३ हजारांच्या वर मतांनी विजयी
- मोठी ब्रेकिंग : रावेर मधून अमोल जावळे पाच हजाराने पुढे
- ब्रेकिंग : ३० हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात, फैजपूर मध्ये गुन्हा दाखल
मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण झाल्यामुळे आता त्याचं आगमन दोन दिवस लांबणीवर पडलं. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होईल. त्यानंतर 5 जूनला कोकणात आणि 7 जूनला मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. यापूर्वी मान्सून मुंबईत 5 जूनला दाखल होणार असल्याचं सांगण्यात आलं असताना सध्या मात्र त्यासाठी परिस्थिती पूरक नसल्याचं दिसत आहे. 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर राज्यात 3 ते 9 जूनमध्ये तो धडकणार आहे. 7 जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळं आता मान्सून लांबला असल्याचे चित्र आहे.