“ती” याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। अयोध्येत २२ जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासंदर्भात काही ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी तर काही ठिकाणी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने २२ जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणारी कायद्याच्या शिवांगी अग्रवाल, सच्च्यदित साळवे, वेदांत अग्रवाल, कृषी बांगिया या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
याचिकेच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला होता की,अशाप्रकारची सार्वजनिक सुट्टी केवळ देशभक्तीच्या निमित्तानं देता येऊ शकते, परंतु एका धार्मिक कार्यक्रमासाठी अशा पद्धतीनं सुट्टी जाहीर करणं चुकीचं आहे. या सुट्टीमुळे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामांचे नुकसान होईल असा दावा या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता .