भाजप सर्वाधिक श्रीमंत पक्ष ,किती संपत्ती?कॉग्रेस जवळपासही नाही
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नवी दिल्ली,वृत्तसंस्था। भारतीय जनता पार्टीने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ८४७.७८ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. सर्व राजकीय पक्षांमध्ये ही सर्वाधिक आहे. भाजपाखालाेखाल बहुजन समाजवादी पार्टीने ६९८.३३ आणि काॅंग्रेसने ५८८.१६ काेटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे.
असाेसिएशन फाॅर डेमाेक्रॅटिक रिफाॅर्म्स (एडीआर) या निवडणूक सुधारणावादी संस्थेने एका अहवालातून ही माहिती दिली. संस्थेने २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय, तसेच प्रादेशिक पक्षांची संपत्ती व देणींच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. त्यात ७ राष्ट्रीय आणि ४४ प्रादेशिक पक्षांचा समावेश आहे. या पक्षांकडून अनुक्रमे ६ हजार ९८८ काेटी आणि २ हजार १२९ काेटी रुपयांची संपत्ती हाेती.
एफडीआर श्रेणीतील जमा
भाजपकडे ३ हजार २५३ काेटी, बसपाकडे ६१७ काेटी व काॅंग्रेसकडे २४० काेटी रुपये एफडीआर श्रेणीमध्ये जमा आहेत. सपाकडे ४३४, टीआरएसकडे २५६ आणि एआयएडीएमकेकडे २४६, तर डीएमकेकडे १६२ काेटी रुपये या श्रेणीत जमा आहेत.