भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

SSC Exam २०२३ : शिक्षण बोर्ड अध्यक्षांचा अजब दावा,”पालकांनी पाल्य कमी जन्माला घातल्याने संख्या घटली”

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।   शालान्त परीक्षा म्हणजे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता १० वीच्या (SSC Exam) परीक्षा २ मार्चपासून सुरु होत आहे. २ ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षी ऑफलाइन स्वरूपात परीक्षा (Offline Exam) झाली होती. वेळेसह काही इतर सवलती विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या. पण आता पूर्वीप्रमाणेच परीक्षा होणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या संख्येत घट
यंदा राज्यात एकूण १५,७७,२५६ विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. यात ८,४४,११६ मुलं तर ७,३३,०६७ मुलींची संख्या आहे. राज्यातील २३,००० माध्यमिक शाळांमध्ये दहावीची परीक्षा होणार आहे.  पण गेल्या तीन वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा ६१ हजार विद्यार्थी संख्या कमी झाली आहे. 

शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांचा अजब दावा
इयत्ता दहावीच्या शालान्त परीक्षेची माहिती देण्यासाठी राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचं कारण सांगताना त्यांनी अजब दावा केला. ” पालकांनी पाल्य कमी जन्माला घातल्याने संख्या घटली” असं अजब वक्तव्य बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केला. 

गेल्या पाच वर्षात विद्यार्थ्यांची संख्या
मार्च १९-१६ लाख ९९ हजार ४६५
मार्च २०-१७ लाख ६५ हजार ८२९
मार्च २१-१६ लाख ५८ हजार ६१४
मार्च २२-१६ लाख ३८ हजार ९६४
मार्च २३-१५ लाख ७७ हजार २५५

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती
शरद गोसावी यांनी दहावीला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार असून बारावीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही वाढीव दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमातील वेळापत्रकरावर विश्वास ठेवू  नये,  मंडळाने प्रसिद्ध केलेले अधिकृत वेळापत्रकच ग्राह्य धरावं असं आव्हान गोसावी यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास करून दडपण न घेता परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नैराश्य येऊ नये म्हणून समुपदेशकांची नियुक्ती केली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.

तसेच यावर्षी २३ हजार १०  शाळांतील २५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ९ विभागीय मंडळात परीक्षा पार पडेल. सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात अर्धा तास आधी सेंटर वर पोहचणे विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या चुकांबाबत मंडळ दिलगीर आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक अशा घटकांमध्ये मंडळाच्या विश्वासार्हतेला बाधा येऊ शकते. मात्र विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची दक्षता घेतली जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!