भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

पुणे,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक आज संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत पार पडतील. तर दहावीची लेखी परीक्षा 2 मार्चला सुरू होऊन 25 मार्च पर्यंत होईल असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 9 विभागीय मंडळाकडून दहावी, बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक याआधी सप्टेंबर महिन्यातच प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी १५ दिवसांची मुदत दिली गेली होती. वेळापत्रकाबाबत आलेल्या सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

इतर कोणतंही वेळापत्रक ग्राह्य धरू नये, बोर्डाचा इशारा
मंडळाकडून असंही सांगण्यात आलं आहे की, संकेतस्थळावर असलेली वेळापत्रकांची सुविधा ही केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेआधी शाळा, महाविद्यालयात छापील स्वरुपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल. त्या वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजर राहावं. व्हॉटसअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेलं वेळापत्रक ग्राह्य धरू नये. याशिवाय प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांच्या परीक्षेचं वेळापत्रक स्वतंत्रपणे संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना कळवण्यात येईल असंही बोर्डाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!