रावेर अवैध धान्यसाठा प्रकरण : अखेर दहा दिवसांनी दोघांवर गुन्हा दाखल
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रावेर शहरात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध धान्यसाठा करणार्या दोन गोदामांना सिल केल्याने शहरासह रावेर-यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. परंतु दहा दिवस झाले तरी त्यावर कुठलीही पुढील कारवाई झाली नव्हती ,त्या बाबत चौकशी सुरू होती अखेर आज दहाव्या दिवशी आठ लाखाचा धान्यसाठा केला म्हणून चौधरी ट्रेड्सच्या मालकासहीत एकावर रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या संदर्भात अधिक माहिती अशी की, जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दि.३१ मे रोजी केलेल्या तपासणीत रावेर शहरातील बर्हाणपूर रोड वरील दोन खाजगी गोदामात धान्याचा अवैधसाठा आढळुन आल्याने हे गोदाम सिल करण्यात आले होते, गेल्या दहा दिवसात या प्रकरणी अहवाल दाखल होऊन चौकशी सुरू होती, अखेर नंतर आज दि १० जून रोजी पुरवठा अधिकारी डी. के. पाटील यांनी रावेर पोलिस स्टेशनला चौधरी ट्रेडर्स चे मालक गणेश देवराम चौधरी रावेर यांच्या चौधरी ट्रेडर्स नावाच्या गोदामात एकूण ७ लाख ७७ हजार २०० रुपयांचा धान्यसाठा आढळुन आला.
यामध्ये २०८ तांदुळाचे कट्टे, १८० मका कट्टे, ९७ गहू कट्टे, ११ ज्वारी कट्टे आणि १७,२५० बारदान आढळले होते. तर संशयित आरोपी मो. रिहान शेख मोईम (रा. नागझिरी मोहल्ला) यांच्या गोदामामध्ये २७,४५० रुपये किमतीचा माल यात १७ तांदळाचे कट्टे, ८ गहु कट्टे असा एकूण दोघे गोदामा मध्ये ८ लाख ४ हजार ६५० रुपये किमतीच्या धान्याचा अवैध साठा मिळून आल्याची फिर्याद दिली असून रावेर पोलिस स्टेशनला जिवनावश्यक कायदा १९५५ कलम ३ व ७ प्रमाणे दोन्ही संशयित आरोपीं विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.