भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

भीमाकोरेगाव शौर्य दिनानिमित्त खिर्डी येथे विजयस्तंभास मानवंदना

खिर्डी ता.रावेर,मंडे टू मंडे न्युज, प्रतिनिधी। एक जानेवारी हा दिवस भीमा कोरेगाव शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो भिमाकोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती खिर्डी बुद्रुक येथे ग्रामपंचायत आवारामध्ये उभारण्यात आली यावेळी विजयस्तंभाला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मानवंदना देण्यात आली.

यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन निंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ पंचायत समिती सदस्य दीपक पाटील सरपंच मधुकर ठाकूर माजी पोलीस पाटील अरुण हरी पाटील खिर्डी खुर्द चे पोलीस पाटील प्रदीप पाटील ग्रामपंचायत सदस्य उषाबाई तायडे ग्रामपंचायत सदस्य विनोद पाटील दि रुरल एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. मुरलीधर पाटील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रफिक बेग असलम मिस्तरी सिद्धार्थ जाधव प्रमुख वक्ते अँड. शिवदास कोचुरे कांतीलाल गाढ़े तसेच जगदीश कोचुरे महेंद्र कोचुरे अँड मोहन कोचुरे रतन कोचुरे विकास जाधव इंद्रीस शेख विनोद कोचुरे यांनी केले.

तसेच सदर कार्यक्रम प्रसंगी अँड. शिवदास कोचुरे म्हणाले की, भिमाकोरेगवचा लढा हा समतेसाठीचा लढा होता. भिमकोरेगावच्या संघर्षाने अस्पृश्यांना आपल्या ताकदीची, शक्तीची आणि शौर्याची जाणीव झाली. तसेच कांतीलाल गाढे यांनी भीमा कोरेगाव संघर्षावर आधारीत स्व:रचित कविता सादर केली. तसेच सायंकाळी गावातून विजयस्तंभाची कॅण्डल रॅली सहित मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक प्रवीण धुंदले सर यांनी केले तर आभार जगदीश कोचुरे यांनी मानले. तसेच सरणत्तय ने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्र्वशांती बुद्ध विहार व्यवस्थापन समिती व भिमकोरेगाव शौर्यदिन, विजयस्थंभ समिती ने प्रयत्न केले. सदर कार्यक्रम प्रसंगी सर्व बौद्ध उपासक उपासीका उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!