भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ ?

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): खिर्डी खु.येथील ग्राम पंचायत प्रशासनास २८-१०-२० रोजी सन २०१५ ते २०२० या कालावधी मध्ये केलेल्या विकास कामांवर वर्षनिहाय झालेल्या खर्च.तसेच राज्य व केंद्र सरकर च्या विविध योजनांतर्गत कोणत्या कामांसाठी निधी मिळाला व तो कसा खर्च करण्यात आला.

तसेच विकास कामाच्या एम.बि बुकाच्या प्रती, खर्चाची बिले, इस्टीमेट,लायसन्स धारक कॉन्ट्रॅक्टर चे नाव पत्ता,ठरावाच्या प्रती,ग्राम पंचायत चे सर्व प्रकारचे बँक अकाऊंट स्टेटमेंट या बाबत ची माहिती मागितलेली असून तीस दिवसाच्या आत मध्ये देणे बंधनकारक असून जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे. ६० दिवसांचा कालावधी लोटला गेला तरी सुध्दा माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली या बाबत अनेक वेळा विचारणा केली असता त्यांनी भाष्य करणे टाळले असून या बाबत मौन का धारण करीत आहे.ग्राम पंचायत जनमाहिती अधिकारी यांच्या कडे माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कायद्यांतर्गत माहिती मिळविण्यासाठी अर्ज सादर केलेला असल्याने ग्राम सेवक हे वेगवेगळे कारण देत असून मागितलेली माहिती अर्जदारास मिळत नाही या मागे काय गौड बंगाल तर नाही या करिता तर माहिती देण्यास टाळाटाळ केली जात नाही ना, या बाबत गटविकास अधिकारी यांचे कडे प्रथम अपील दाखल करण्यात आले असून काही कारवाई करतील का? ग्राम सेवकास पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर केला जाणार नाही ना या कडे माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे लक्ष लागून आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!