भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याशैक्षणिक

विद्यापीठाच्या परीक्षांकरीता UGC कडुन स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी

नवी दिल्ली। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) मार्गदर्शक तत्वांवरून सुरू असलेला वाद ताजा असतानाच आता यूजीसीने परीक्षा कशा घेतल्या जाव्यात यासाठी स्टॅडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) जारी केले आहे. या मध्ये परीक्षेच्या आयोजनासंदर्भातील निर्देश आहेत. त्यापैकी काही नियम असे –

जेथे रहदारी, वाहतुकीवर निर्बंध असतील, त्या भागात विद्यार्थ्यांचे आयकार्ड हेच वाहतुकीसाठी पास समजावेत.

गेटवर, परीक्षा हॉलमध्ये स्टाफरुममध्ये सॅनिटायझर बॉटल्सची व्यवस्था करावी.

एका वर्गात चार रांगा (बेंचच्या) असतील आणि त्यामध्ये एका सीटची जागा मोकळी असेल.

संपूर्ण परीक्षा केंद्राचे निर्जंतुकीकरण करावे.

दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान २ मीटरचे अंतर असावे.

सर्व स्वच्छतागृह स्वच्छ, निर्जंतुक करावेत.

दोन विद्यार्थ्यांमधील एक आसन रिकामे ठेवावे

सर्व दारे, खिडक्यांचे हँडल्स, जिन्याचे रेलिंग, लिफ्टची बटणे आदी निर्जंतुक करावीत.

परीक्षेचे कामकाज हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फ्रेश मास्क आणि ग्लोव्ह्ज वापरावेत.

UGC ने ६ तारखेला सुधारित मार्गदर्शक तत्वे जारी करून विद्यापीठांना पदवीच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. या परीक्षा सप्टेंबर महिन्या अखेर घ्याव्यात, असेही सांगितले. मात्र, महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पदवी परीक्षा रद्द केल्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाने यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. राज्यात परीक्षा घेण्यासारखी स्थिती नाही, असं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत वारंवार सांगतायेतं वृत्तवाहिन्यांना त्यांनी सांगितले होते परीक्षा घ्यायच्याच झाल्या तर यूजीसीने SOP जाहीर करावी व काही तासांतच यूजीसीची एसओपी जाहीर झाली. त्यामुळे गुरुवारी दुपारी सामंत यासंदर्भात एक पत्रकार परिषदेत काय सांगतात याकडे लाखो विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!