संसर्ग वाढतोय; जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांचा १० हजाराचा टप्पा पार, आज ३१२ नविन रुग्ण !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात ३१२ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ३१२ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ६३ रूग्ण हे जामनेर शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जळगाव शहर ४१, एरंडोल ३, चाळीसगाव ४३, रावेर १३, भुसावळ १०, आणि मुक्ताईनगर १३, जळगाव ग्रामीण ११, अमळनरे २५, चोपडा २६, पाचोरा ८, धरणगाव १४, पारोळा १७, बोदवळ १, भळगाव ११, यावल १० ,इतर ३ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १००४४ इतका झालेला आहे. यातील ६५०५ रूग्ण बरे झाले आहेत. आजवरील मृतांची संख्या ४६९ इतकी तर उपचार घेत असलेले ३०७० असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.