भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

अट्रावल येथे ३० वर्षीय महिलेचा विनयभंग प्रकरणातील फरार आरोपीस अटक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील अट्रावल येथे ३० वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महिलेने यावल पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता .सादर आरोपी फरार होता.

१३ जुलै रोजी गावातील रिंकू विनायक उर्फ आनंदा तायडे व विक्की मारोती तायडे यांच्यासह अन्य एकाने विवाहितेच्या घरासमोरच्या ओट्यावर बांधलेली गॅलरी तोडून टाकतो असे बोलून वाद घातला. विवाहितेच्या पतीने विचारणा केल्याचा राग येवून तिघांनी विवाहितेचा पती, सासरे यांना शिवीगाळ व मारहाण केली. लोखंडी रॉडने जिवेे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केला तसेच विवाहितेचा विनयभंग केला. या प्रकरणी पोलिसांत विनयभंगासह जिवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाला तेव्हापासून संशयित आरोपी विक्की तायडे हा पोलिसांना गुंगारा देत होता. संशयित आरोपी गावात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाल्याने सापळा रचून उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व पथकाने त्यास अटक केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!