अवैध देशी- विदेशी दारू विक्रेत्यांवर निंभोरा पोलिसांची कारवाई…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। खिर्डी, ऐनपूर व निंभोरा बुद्रुक या गावी अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली असून ऐनपूर गावाचे हद्दीतील ऐनपूर ते खिर्डी रस्त्यावरील चिच फाट्याच्या जवळ असलेल्या संकेत धाब्याच्या आडोशाला मधुकर प्रभाकर ठाकूर वय 30 राहणार खिर्डी बुद्रुक तालुका रावेर यांनी 6922 रुपये किंमतीची देशी-विदेशी कंपनीच्या सीलबंद बाटल्यांची चोरटी विक्री विनापास बाळगून विक्री करताना मिळून आल्याने तसेच खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ऐनपुर रस्त्यावरील ब्रम्हा ढाब्याच्या आडोशाला ब्रम्हानंद छगन जयस्वाल व 41 राहणार खिर्डी बुद्रुक तालुका रावेर यांनी 3330 रुपये किंमतीची विदेशी दारूची विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आला आहे तसेच खिर्डी बुद्रुक गावातील खिर्डी ते ऐनपूर रस्त्यावरील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या पुढे असणार्या भाऊ ढाब्याच्या आडोशाला चंद्रकांत जयराम कोळी वय 30 रा. जळगाव तालुका जळगाव हल्ली मुक्काम वाघाडी यांनीसुद्धा 2665 रुपये किमतीची विदेशी दारूची चोरटी विक्री स्वतःच्या फायद्यासाठी करत असताना मिळून आले आहे असे एकूण 12 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे म्हणून त्यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 व कोरोना महामारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत जळगाव यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून भादंवि कलम 188 269 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
तसेच निंभोरा बुद्रुक गावातील भरत रमेश महाले वय 27 व निलेश संतोष कोळी वय 24 यांनी देखील त्यांच्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टीची दारू अनुक्रमे 15 लिटर सहाशे रुपये किंमतीची व वीस लिटर आठशे रुपये किंमतीची दारु कब्जात बाळगून चोरटी विक्री करत असताना आढळून आल्याने त्यांचे विरोधात निंभोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदर कारवाई सपोनि स्वप्नील उन्नवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश वराडे ,पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश सूर्यवंशी ,पोलीस नाईक ईश्वर चव्हाण, पोलीस नाईक स्वप्नील पाटील व होमगार्ड योगेश फालक यांनी केलेली आहे…