आनंदाची बातमी; कोरोनवरील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली Vaccine चाचणी यशस्वी व सुरक्षित !
नवी दिल्ली (वृत्तसंस्था): जगभरात कोरोनाचे थैमान सूरू आहे याला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक लसीवरती काम करत असून वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागुन असलेल्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने कोरोना व्हायरसविरोधात बनवलेल्या लसीच्या चाचणीचा अहवाल आला असून ही चाचणी यशस्वी झाल्याचे सांगितेल जात आहे. ‘दि लॅन्सेट’ या जगप्रसिद्ध मेडिकल जर्नलमध्ये लसीचा अहवाल अखेर प्रसिद्ध झाला आहे. अहवालात म्हटल्या नुसार ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारी आहे.
Oxford's coronavirus vaccine 'safe, immunogenic': Study
Read @ANI Story | https://t.co/sCn0YakTXe pic.twitter.com/zXD2HUeCPo
— ANI Digital (@ani_digital) July 20, 2020
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बनवलेली लस ही पूर्णपणे मानव शरीरस एकदन सुरक्षित व रोगप्रतिकारक शक्तीला सुद्धा चालना देणारी असल्याचे अहवालांमध्ये नमुद केले आहे. या लसीची मानवी चाचणी १ हजार ०७७ जणांवरती करण्यात आली या लसीचे प्रयोग घेतले गेले त्यामध्ये कोरोना व्हायरसशी लढण्या साठी उपयुक्त असलेल्या अँटीबॉडीज व पांढऱ्या पेशी निर्माण झाल्याचे आढळून आले. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने भारतात पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीचे उत्पादन करण्याची जबाबदारी दिली असून ब्रिटेनने आधीच या लसीचे १० कोटी डोस बनवून ठेवले आहेत.