भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

बिहार निवडणूक; एनडीएची जोरदार मुसंडी, या जागांवर दणदणीत विजय

बिहार (वृत्तसंस्था): बिहार विधानसभा निवडणुकीची  मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत आघाडीच्या निकालानंतर आता विजयी निकालाची बातमी समोर आली आहे. एनडीएने 22 जागांवर विजय मिळवला आहे. तर जदयूने 6 जागांवर आणि भाजपने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर महागठबंधनने 10 जागा जिंकल्या आहेत.

भाजपने पहिला विजय हा दरभंगातील केवटी मतदारसंघातून मिळवला आहे.  भाजपचे उमेदवार मुरारी मोहन झा हे विजयी झाले आहे. त्यांनी राजदचे उमेदवार अब्दुल सिद्दिकीचा पराभव केला आहे. त्यानंतर वेगवेगळ्या मतदारसंघातून आघाडीवर असलेल्या जागा आता विजयात रुपांतरीत झाल्या आहे. आतापर्यंत भाजपने 16 जागा जिंकल्या आहेत. भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडयू 46 जागांवर आघाडीवर आहे.

आज सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत एनडीए आणि महागठबंधनमध्ये काँटे की टक्कर पाहण्यास मिळाली. कुठे महागठबंधन आघाडीवर होते तर कधी एनडीएने आघाडी घेतली होती. पण, दुपार नंतर चित्र हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एनडीएने सर्वाधिक 128 जागांवर आघाडी घेतली आहे. बहुमतासाठी लागत असलेल्या 121 जागांचा आकडा एनडीएने पार केला आहे.

तर राजद महागठबंधनला 103 जागावर आघाडीवर आहे. तर लोक जनशक्ती पार्टी 2 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. एकटा भाजपने सर्वाधिक 73 जागांवर मुसंडी मारली आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 53 जागा आल्या होत्या. तर नितीशकुमार यांच्या जदयूला 71 जागा मिळाल्या होत्या. पण, आता जदयूची घसरगुंडी झाली असून 47 जागांवर आघाडीवर आहे.  त्यामुळे भाजप आता बिहारमध्ये मोठा भाऊ ठरला आहे. भाजपकडे सर्वाधिक जागा असल्यामुळे नितीशकुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होतील का, असा प्रश्न आता उपस्थितीत झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!