ऐनपुर येथील स. व .पटेल विद्यालयाचे पाणी रस्त्यावर : नागरिकांची गैरसोय
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
ऐनपुर ता.रावेर(प्रतिनिधी)। ऐनपुर येथील सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय व ज्यू. कॉलेजमधुन येणारे वेस्टेज पाणी हे प्राथमिक आरोग्य केन्द्राकडे जाणाऱ्या रस्त्याकड़े उभा पाइप टाकून काढण्यात आलेला आहे तसेच येथे गटार आहे परन्तु ती अपूर्ण स्थितीत दिसून येते त्यासाठी शाळेच्या उभ्या पाइप मधुन येणारे पाणी हे प्राथमिक आरोग्य केन्द्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर इतरत्र पसरताना दिसून येते तसेच अक्षरशः प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या-जाणाऱ्या पेशंट तसेच इतर लोकांना त्याचा कमालीचा त्रास होतो.
त्या पाण्यासाठी टाकलेल्या पाइप जवळ शाळेची मुतारी सुद्धा आहे या पाण्यासोबत मुतारीचे ही पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच या गटारि जवळ गवताचे तन झालेले असून सर्व दूर दुर्गंधि होत आहे व गटार आहे किंवा नाही हे सुद्धा या गवता मुळे पूर्णपणे दिसत नाही व हे पाणी गटारित न जाता रस्त्यावर पसरत आहे या जागेजवळच जिल्हा परिषदेची उर्दू शाळा सुद्धा आहे तरी शाळा प्रशासनाने रस्त्यावर येत असलेल्या पाण्याची योग्य ती विल्हेवाट लाउन त्या रस्त्याने नागरिकांची तसेच पेशंटची होत असलेली ग़ैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिकां कडून केली जात आहे.