ओबीसी महासभेच्या नाशिक विभाग उपाध्यक्ष पदी नितीन सरोदे यांची निवड
नाशिक (प्रतिनिधी)। नाशिक येथे नुकतेच पार पडलेल्या अखिल भारतीय ओबीसी महासभेचे राज्य प्रतिनिधी अधिवेशनात नितीन नारायण सरोदे यांची नाशिक विभाग उपाध्यक्ष पदावर तर राजेंद्र फेगडे यांची नाशिक जिल्हा कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली.
महासभेच्या मुंबई विभाग अध्यक्ष जनार्दन जंगले यांनी सदर नियुक्ती केली आहे. येत्या ८ फेब्रुवारी २०२१ पासून देशात जनगणना होणार आहे, परंतु एससी, एसटी प्रमाणे ओबीसीची जनगणना करण्यास केंद्राने नकार दिला आहे, ओबीसी ५२% टक्के असले तरी त्यांना त्यांचे सामाजिक, राजकिय व आर्थिक हक्क मिळत नसल्याने व ते सर्व हक्क सत्ताधारी कमी टक्केवालेंनी हिरावून घेतले असल्याने ओबीसी जनगणना होणे अत्यावश्यक आहे, राज्यातील ३६० पेक्षा जास्त ओबीसी जातींना जागी करण्यासाठी डिसेंबर जानेवारी मध्ये जनगणना जनजागृती मोहिम सुरू होत आहे, दरवाजावर पाटी लावून जोपर्यंत जनगणना फॉर्म मध्ये ओबीसी कॉलम नाही तोपर्यंत ओबीसीं चा जनगणनेवर असहकार असेल असे केंद्र सरकारला ठणकावून सांगायचे आहे. ओबीसी आरक्षण हिसकून घेण्याचे प्रयत्न एकजुटीने हाणून पाडण्यासाठी पक्षविरहित, निस्वार्थी तरुणांनी ओबीसी महासभेत सहभागी व्हावे असे आवाहन ओबीसी महासभे कडून करण्यात आले आहे .