कोरोनाचे थैमान! जळगांव जिल्ह्यात आजपर्यंत सर्वाधिक आकडा: ५२० कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगांव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ५२० रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव मधील १५४ बाधित आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १५४ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ७१ रूग्ण हे जामनेर येथील आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर ७, जळगाव ग्रामीण ३९, पाचोरा ११, भुसावळ १७, अमळनेर ३४, चोपडा १३, भडगाव १६, धरणगाव ६, यावल १३, एरंडोल ४०, पारोळा ११, चाळीसगाव ५५, मुक्ताईनगर २५, बोदवड ३, अन्य जिल्हा ५ असे रूग्ण आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १४८६३ इतका झालेला आहे. यातील १०३०५ रूग्ण बरे झाले आहेत. आज १२ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६१३ इतकी तर उपचार घेत असलेले ३९४५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.