कोरोनाचे थैमान सुरूच; जळगाव जिल्ह्यात आज नविन ६०५ रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६०५ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित चोपडा आणि जळगाव शहरातील आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक ९३ रूग्ण हे चोपडा तालुक्यातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ९० रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता एरंडोल ८२, जळगाव ग्रामीण ७२, रावेर ३०, पारोळा ७, जामनेर १७, पाचोरा ९, भुसावळ १८, अमळनेर १२, भडगाव ६१, धरणगाव १७, यावल १०, चाळीसगाव ६७, मुक्ताईनगर १, बोदवड १२, अन्य जिल्हा ७ असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १९६८७ इतका झालेला आहे. यातील १३५२७ रूग्ण बरे झाले आहेत. आज १० रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ६८८ इतकी तर उपचार घेत असलेले ५४७२ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.