कोविंड 19 च्या अनुषंगाने लॉक डाउन काळातील भाडे माफ करावे गाडे धारकांची मागणी !
सावदा (प्रतिनिधी)। येथील नगरपालिकेचे सरदार वल्लभाई पटेल व्यापारी संकुलन व दुर्गा माता व्यापारी संकुलनातील दुकानदारांनी मुख्याधिकारी श्री.सौरभ जोशी यांच्याकडे लॉक डाऊन असलेल्या काळातील भाडे माफ करावे याबाबत ३१ दुकानदारांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले.
दोन्ही संकुलातील व्यापारी व दुकानदारांनी कोरोनाच्या महामारी मुळे सावदा शहरात लोक डाऊन, चे नियम पाळून सहकार्य केले व दुकाने बंद ठेवली त्यामुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले दुकाने बंद असलेल्या काळातील भाडे व सन २०२० चा दुकानाचा टॅक्स माफ करावा असे लेखी निवेदन नगरपालिकेकडे देण्यात आले यावेळी शरद भारंबे, ब्रजमोहन (बंडू) जावळे, चंद्रकांत टेलर, प्रतिक भारंबे, नरसिंग पुरभी, विशाल चौधरी, सतिश न्हावी, नितीन बेंडाळे, संजू जैन, वसंत सरवदे, विलास कुलकर्णी, ज्वालासिंग ठाकूर व इतर दुकानदार हजर होते