खिर्डी खु.येथे विकास कामांचा फज्जा; गटारीचे सांडपाणी घुसले रहिवाश्यांच्या घरात…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): नवीन गावठाण परिसरातील पाण्याच्या टाकीचे ओव्हर फ्लो पाणी पाईप द्वारे गटारात काढलेली असून त्या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया जात असते तसेच ग्राम पंचायत प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी विकास कामे करण्यात आली.
त्यात गटारे बांधकाम केले असून इस्टीमेट व अंदाज पत्रका नुसार काम करण्यात येत नाही सबंधित ठेकेदार यांनी मनमर्जी प्रमाणे गटारे बांधकाम केले असून योग्य ती उतार लेव्हल न घेतल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही गटारी चे पाणी साचल्याने उलटे सांडपाणी हे रहिवाशी लोकांच्या घरात घुसल्याने ग्राम पंचायत प्रशासनाच्या बाबत रोष व्यक्त करण्यात आला या गंभीर समस्येकडे लक्ष देतील का असा गहन प्रश्न रहिवाशांना पडला आहे.