भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

खिर्डी खु. येथे हागणदारी मुक्त योजनेचा फज्जा; शौचालयाची दुरवस्था…..

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी)। राज्य शासन हागणदारी मुक्त गाव करण्यासाठी लाखो रुपये खर्च करीत असताना ग्रामीण भागात अजूनही त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथे बाजार पट्टा गट नं.-3 मध्ये पडीक जागेवर शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून कित्येक वर्षांपासून शौचालयाचे बांधकाम झालेले असताना ते पाण्या अभावी वापरता येत नाहीत तसेच आजु बाजुला गवत व उकीरड्यांच्या घाणी मुळे सदर ठिकाणी जायला रस्ता नाही.तर रात्री शौचालयात उजेडाची कुठलीही व्यवस्था नसून एक ही लाईट त्या ठिकाणी लावण्यात आला नाही.त्या ठिकाणी पाणी साठविण्या करिता व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे असताना कोणत्याही प्रकारची सोय करण्यात आली नाही. हागणदारी मुक्त गावाचा फलक लोकांच्या सहज दृष्टीस पडू नये म्हणून स्टेशन रस्त्यावरील बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात लावण्यात आला आहे.

या बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.परंतु सदर गाव हागणदारी मुक्त झाले याची कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात येत नाही.निकृष्ट प्रतीच्या शौचालयांची नावालाच उभारणी केलेल्या गावातील नागरिक हातात लोटा घेवून उघड्यावर शौचास जातांना चे चित्र दिसून येत आहे तसेच गावात मुख्य रस्त्यावर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे नाकाला रुमाल लावून रस्ता पार करावा लागतो. शासना कडून कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.तालुक्याच्या पं.स.कार्यालयात बसून ग्रामसेवक व अधिकारी यांनी संपूर्ण गाव हागणदारी मुक्त झाले असे कागदोपत्री दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेतली आणि शासनाचे संदेश फलका द्वारे खिर्डी खु हे गाव हागणदारी मुक्त झाले असे दाखविण्यात आले परंतु प्रत्यक्षात, हागणदारी मुक्त गाव योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी या सर्व बाबींची चौकशी करून कारवाई करतील का? या कडे गावातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!