खिर्डी खु येथील नवीन प्लॉट भागात घाणीचे साम्राज्य….
खिर्डी ता.रावेर (प्रतिनिधी): रावेर तालुक्यातील खिर्डी खु येथील नवीन प्लॉट भागात गटारी ची दुरवस्था झाली असून सांडपाण्याचा योग्य तो निचरा होत नसल्यामुळे समोर असलेल्या मोकळ्या जागेत साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने व गवतामुळे डासांची उत्पत्ती वाढल्याने रहिवाशी त्रस्त झाले आहे.
डेंग्यू,मलेरिया,चिकन गुनिया सारख्या आजारास पोषक वातावरण निर्माण झाले असून या गंभीर समस्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते.जीर्ण झालेल्या गटारी सदोष असून जैसे थे ची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या गटारी ऐवजी नवीन गटारीची निर्मिती करण्यात आली नाही तसेच मुख्य गटार न बांधल्याने गाळामुळे पूर्ण गटारी ब्लॉक झाले असून सांडपाणी रस्त्यात व मैदानात साचते यामुळे परिसरातील लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो.गटारी कधीही वेळेवर साफ होत नाहीत त्यामुळे नवीन प्लॉट भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.या सर्व गोष्टी कडे ग्राम पंचायत प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न परिसरातील लोकांना पडला आहे.