खोटे शिक्के व कागदपत्र तयार करून रेशन दुकानदारानेच बनवले खोटे रेशन कार्ड
रावेर (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील के-हाळा बु येथील रेशन दुकानदाराने खोटे शिक्के व खोटे कागदपत्र तयार करून त्यावर शासकीय अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून रेशन कार्ड तयार केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक असे, फिर्यादी महेशचंद्र लोखंडे रा.रावेर यांनी केलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील के-हाळा बु.येथील रेशन दुकानदार दिगंबर रामचंद्र बाविस्कर यांने बनावट रेशन कार्डच्या आधारे जमीन खरेदी केली असल्याची तक्रार दाखल करत आरोपी हा शेतकरी नसताना त्याने शेती घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याची फिर्यादी यांची तक्रार होती. शेतीचे खरेदीचा नोंदणीकृत सौदे पावती रद्द मनाईहुकूम साठी रावेर न्यायालयात दाव्यातील बनावट शिधापत्रिका चे दस्तऐवज पुरावा दाखल केल्याने न्यायालयाने कलम १५६ ( ३ ) प्रमाणे दिगंबर रामचंद्र बाविस्कर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींना न्यायालयाने १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे . यामुळे रेशन दुकानदार चालकानेच बनावट शिधापत्रिका तयार केल्याने खडबड उडाली आहे.