गहुखेडा येथे जि.प प्राथमिक शाळेच्या संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन रोहिणी खडसे यांच्या हस्ते संपन्न
सावदा (प्रतिनिधी)। गहुखेडा ता रावेर येथे रोजगार हमी योजना, चौदावा वित्त आयोग आणि डी पी डी सि च्या संयुक्त निधीमधुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत बांधकामाचे भूमिपूजन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी उपस्थितां समवेत संवाद साधताना रोहिणी खडसे खेवलकर म्हणाल्या प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलांच्या जीवनात फार असते. संरक्षण भिंतिचे काम पूर्ण झाल्यानंतर शाळेच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. शाळेच्या भिंतीवर पाढे , मुळाक्षरे, सुंदर चित्रे रेखाटली असल्यामुळे शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत यावरून शिक्षकांची शाळेप्रतीअसलेली भावना आणि ते घेत असलेली मेहनत लक्षात येते
बोलक्या भिंती मुळे मन प्रसन्न वाटते यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तर भर पडतेच पण प्रसन्न वातावरणात लहान मुलांचे अभ्यासात पण मन रमते
शिक्षक घेत असलेल्या मेहनती बद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते व परिसरात त्यांनी आणखी झाडे, फुलझाडे लावून परिसराची शोभा वाढवावी ही अपेक्षा व्यक्त करते याप्रसंगी भाजपा विधानसभा सह क्षेत्र प्रमुख शिवाजीराव पाटील, जि प सदस्य कैलास सरोदे,भाजप तालुका सरचिटणीस महेश चौधरी, सरपंच जे के पाटील,सुधाकर कोळी, सदाशिवराव पाटील, सचिन पाटील,वसंतराव चौधरी, प्रवीण पाटील,रवींद्र सोनवणे, किशोर तायडे, नामदेवराव कोळी, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते