गांधी कुटुंबाच्या तीन संस्थांच्या चौकशीचे आदेश; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय !
नवी दिल्ली: केंद्र सरकारने गांधी कुटुंबीयांना मोठा धक्का दिला असून राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीच्या समन्वयासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने आंतर मंत्री समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करत ही माहिती दिली. राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टने पीएमएलए कायदा, आयकर कायदा आणि एफसीआरएचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
सक्तवसुली संचालयानालयाचे विशेष संचालक या आंतर मंत्री समितीचे प्रमुख असणार आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना त्यांना दिलेला दिल्लीतील बंगला खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. सुरक्षेच्या कारणावरून त्यांना हा बंगला देण्यात आला होता.
दिल्लीतील चीनी दूतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशनला फंडिंग केले जाते असा आरोप भारतीय जनता पक्षाने कालच केला होता. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्रालयाने हे चौकशीचे आदेश दिले आहेत.