ग्रामीण रुग्णालय न्हावी येथे ” स्थापने नंतर २१ वर्षांनी ” प्रथमच सिझर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
न्हावी. ता.यावल (प्रतिनिधी)। ग्रामीण रुग्णालय न्हावी येथील डॉ. अभिजीत सरोदे, वैद्यकीय अधिक्षक तथा स्त्रि-रोग तज्ञ प्रथमच डॉ. नागेश चव्हाण जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन ग्रामीण रुग्णालय न्हावी येथे सिझर केलेले आहे.
पहिली खेप असलेली १९ वर्षीय अनिशा रुबाब तडवी , अतिशय गरीब घरातील गर्भवती माता – गर्भाशयातील बाळा भोवती पाणी अतिशय कमी तसेच दिवस जास्त झालेले असले कारणाने बाळ सिझर करून बाहेर काढण्यात आले. माता व बाळ दोघांचीही तब्बेत सुखरूप असल्याची माहिती डॉ. अभिजीत सरोदे यांनी दिली. डॉ. अभिजीत सरोदे -स्त्रि–रोग तज्ञ, डॉ. बी. बी.बारेला – सहाय्यक , डॉ. प्रफुल्ल पाटील – भूलतज्ञ, डॉ. प्रसाद पाटील – बालरोग तज्ञ , डॉ. कौस्तुभ तळेले रीता धांडे – अधिपरिचारिका , यांच्या चमूने डॉ. नागेश चव्हाण- जिल्हा शल्य चिकित्सक व डॉ. हेमंत बऱ्हाटे- तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालय येथे सिझर ची सुविधा गरजू गर्भवती मातांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे.