चिंताजनक! कोरोना वाढतोय मात्र रोगप्रतिकारशक्ती होतीये कमी, संशोधनातून आलं समोर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
मुंबई (प्रतिनिधी): लोकांच्या मनात असाही प्रश्न उपस्थित होत आहे, की कोरोनाविरोधात प्रतिकार करण्यासाठी शरीरात किती काळापर्यंत नैसर्गिक प्रतिकारशक्ती टिकून राहाते. एकूण संक्रमित लोकांपैकी 20 ते 30 टक्के लोकांनी 6 महिन्यांनंतर ही नैसर्गिक प्रतिकारशक्ती गमावली आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. यादरम्यान रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरण मोहिमेला आणखी वेग देण्यात येत आहे. यादरम्यान लोकांच्या मनात असाही प्रश्न उपस्थित होत आहे, की कोरोनाविरोधात प्रतिकार करण्यासाठी शरीरात किती काळापर्यंत नैसर्गिक प्रतिकारशक्ती टी
कून राहाते.
इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीच्या (IGIB) अभ्यासानुसार असा दावा केला गेला आहे, की कोरोना विषाणूविरूद्ध नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमीत कमी 6 ते 7 महिन्यांपर्यंत कायम राहाते. परंतु, एकूण संक्रमित लोकांपैकी 20 ते 30 टक्के लोकांनी 6 महिन्यांनंतर ही नैसर्गिक प्रतिकारशक्ती गमावली आहे.
आयजीआयबीचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘अभ्यासात असे आढळले आहे की 20 ते 30 टक्के लोकांच्या शरीरात विषाणूचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. डॉ. अग्रवाल म्हणतात, की 6 महिन्यांचा हा अभ्यास हे माहिती करून घेण्यासाठी उपयुक्त ठरला आहे, की मुंबईसारख्या शहरांमध्ये सिरोपॉझिटिव्हिटी असतानाही कोरोनाचा प्रसार वाढत का आहे.