भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

चिंताजनक; रावेर तालुक्यात २३ रुग्णांना कोरोनाची बाधा; निंभोऱ्यातील २१ संशयित स्लॅबसाठी रवाना !

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालल्याचे दिसून येत असून गेल्या २० तासांत प्राप्त अहवालांमध्ये तालुक्यात पुन्हा 23 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

रावेर तालुक्यात आढळलेल्या २३ रुग्णांमध्ये रावेर शहरातील शिवाजी चौक, सौभाग्य नगर, संत रोहिदास नगर, महात्मा फुले चौक, अष्टविनायक नगर, उतखेडा रोड व गांधी चौक- प्रत्येकी १ रुग्ण अशे ७ रुग्ण तर निंभोरा गावातील काल रात्रीचे ९ व आज आलेले ३ रुग अशे एकूण १२ रुग्ण, अटवाड्यातील ३ रुग्ण, खिर्डी बु. श्री कृष्ण मंदिर परिसरातील १ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील आता एकुण रूग्ण संख्या ४५७ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ३२१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर मयत ३५ असून १०१ रुग्ण उपचार घेत आहेत. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला असून निंभोरा येथून बस स्टँड परिसरातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील २१ संशयितांना कॉरटाईन करून त्यांचे स्लॅब घेण्यासाठी त्यांना फैजपुर कोविड सेंटर ला पाठवण्यात येत आहे अशी माहिती निंभोरा वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांनी दिली आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन-

कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!