चिंता कायम! जळगाव जिल्ह्यात आज आणखी १६९ रुग्णांना कोरोनाची बाधा!
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १६९ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १६९ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ५७ रूग्ण जळगाव शहरातील आहेत. या खालोखाल अमळनेर येथे १८, बोदवड १६, एरंडोल १४, जामनेर १४, जळगाव ग्रामीण १२, भुसावळ ९, यावल ८, रावेर ५, चोपडा ४, भडगाव व धरणगाव प्रत्येकी ३, पारोळा २, मुक्ताईनगर १, पाचोरा १ अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत वाढ होत आहे
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा रुग्ण संख्या ४१७६ झाली आहे. यातील २४७६ रूग्ण बरे झाले आहेत. तर आज ११ रुग्णांचा मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या २६३ इतकी असल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे.