चिनावलात आज आणखी ३ रुग्णांना कोरोनाची बाधा !
चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। गावात कोरोनाचा सुरवातीला असा फारसा प्रभाव नव्हता परंतु मध्यंतरी गावाला कोरोनाचा विळखा पडला असल्याचे दिसून आले होते नंतर गावांत कुणी बाधित आढळून आले नव्हते मात्र स्थानिक प्रशासनाला सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावातील ३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यांतील एक रुग्ण काल मयत झाला होता तर आज सकाळी त्यांचा अहवाल बाधित आढळून आला आहे.
गावातील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात बाधित ३ रुग्णामध्ये एक ४७ वर्षीय पुरुष मयत पावलेला व दोन उपचार घेत असलेले एक २७ वर्षीय, एक ५० वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश आहे. सदरील उपचार घेत असलेले रुग्ण सरकारी दवाखाना परिसरातील व मयत रुग्ण मुलांचे वसतीगृह परिसरातील रहिवासी आहे. सदरील वृत्ताने गावात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाईन करण्यात येत असून ग्रामपंचायत प्रशासन कडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
चिनवाल गावातील एकूण बाधित संख्या ४० झाली असून त्यात ३ मयत आहेत, तर २ उपचार घेत असून ३५ कोरोना योद्धे घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.