चिनावल कुंभारखेडा रस्ता दुरुस्तीचे कामं लवकर सुरू करा, गावकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
चिनवाल ता, रावेर (प्रतिनिधी) ।वाघोदा,चिनावल,कुंभारखेडा या गावांना जोडणारा दुवा एकमेव रस्ता आहे, या परिसरात केळी ची मोठी बाजारपेठ आहे ,या परिसरात दररोज चाळीस, पन्नास, ट्रक केळीची वाहतूक बाहेर राज्यात याचं मुख्य रस्त्याने मोठ्या प्रमाणात जड वाहनांनी केली जाते, या एका ट्रक चे अंदाजे दिडेश ते पावणे दोनशे क्क्लिंटल वजन असते, तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बैलगाडी, ट्रक्टर ,रिक्षा सह मोटारसायकल यांनी नेहमीच रहदारी ने वापरत असतात, तसेच आताचं पावसाळ्याचीही सुरूवात झाली असून, यामुळे सर्व सामान्य जनतेला या नादुरुस्त रस्त्यामुळे जाणे येणे खुप जिकिरीचे होतं असून शेतकऱ्यांना मध्ये संतापाची लाट उसळली असून सदर रस्त्यांचे काम लवकर लवकर सुरू करावे, संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी संवेदनशीलता दाखवी,अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली जात आहे.