भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

चिनावल मध्ये आज एका रुग्णांचा अहवाल कोरोना बाधित !

चिनावल ता.रावेर(प्रतिनिधी)। चिनावल गावात कोरोनाचा प्रादुर्भाव मध्यंतरी मोठ्या प्रमाणात आढळून आला होता. नंतर गावातील बाधित संख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते म्हणून गावकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र आज आलेल्या अहवाल गावांतील आणखी एक रुग्णांस कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज आलेल्या अवहवाला मध्ये गावातील ५० वर्षीय पुरुषांचा अहवाल बाधित आढळून आला आहे, बाधित आढळलेल्या रुग्णांच्या घरातील आधी व्यक्ती आधी बाधित आढळून आल्या आहेत. सदरील रुग्ण सेंट्रल बँक परिसरातील रहिवासी असुन परिसर आधीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित आहे.  गावातील बधितांची संख्या ४० झाली असून त्यात सुद्या उपचार घेत असलेले ३ तर मयत रुग्ण ३ आहेत व ३४ जणांनी कोरोना धोबीपछाड देत सुखरूप घरी परतले आहे. सदरील वृत्तास प्रशासना कडुन दुजोरा मिळाला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!