जळगांव जिल्ह्यात आज ९४८ कोरोना पॉझिटिव्ह !
जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आलेल्या कोराना अहवालात एकुण ९४८ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले. ८११ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर २५२, सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे तसेच जळगाव ग्रामीण ५५, भुसावळ ८८, अमळनेर ८८, चोपडा ४७, पाचोरा ४३, भडगाव ११, धरणगाव ४६, यावल ५८, एरंडोल ३३, जामनेर ७३, रावेर १५, पारोळा १२, चाळीसगाव ९२, मुक्ताईनगर १६, बोदवड १३ व दुसर्या जिल्ह्यांमधील १५ असे रूग्ण आढळून आले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४१८५६ इतका झालेला आहे. यातील ३०७०२ रूग्ण बरे झाले आहेत. आज १६ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या १०४३ इतकी तर उपचार घेत असलेले १०१११ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.