जळगांव जिल्ह्यात १५२ रुग्ण पॉझिटिव्ह; नविन १६९ कोरोनामुक्त
जळगाव प्रतिनिधी । आज जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त कोरोना अहवालात १५२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून आजच १६९ रूग्ण कोरोनावर मात करत घरी परतले आहे.
जिल्ह्यातील कोरोनाची एकुण आकडेवारी–
जळगाव शहर ५७, जळगाव ग्रामीण ७, भुसावळ २४, अमळनेर ९, चोपडा १४, पाचोरा ७, भडगाव ३, धरणगाव ०, यावल ६, एरंडोल १, जामनेर ८, रावेर ११, पारोळा ०, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर ०, बोदवड २, इतर जिल्हातील ० असे एकुण १५२ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकुण ५२०४१ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून ४८९३५ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे, तर १८६२ रूग्ण उपचार घेत आहे. आज ३ रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकुण १२४४ रूग्णांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यातील रिकव्हरी रेट हा ९४.०३ टक्क्यांवर पोहचला आहे.