जळगावं जिल्ह्यात आज ८३५ नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात ८३५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ८३५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १९९ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल रावेर ८, एरंडोल ७५, चाळीसगाव ८०, भुसावळ ३४, आणि मुक्ताईनगर २०, जामनेर ६२, जळगाव ग्रामीण ३५, अमळनेर १००, चोपडा ५१, पाचोरा ५, धरणगाव ८, पारोळा ९५, बोदवळ ७, भळगाव ११, यावल ३९, इतर १ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ३४४५३ इतका झालेला आहे. यातील २४३०४ रूग्ण बरे झाले आहेत. आज १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ८९४ इतकी तर उपचार घेत असलेले ९२५५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.