भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगावं जिल्ह्या कोरोनाने हादरला; आज १०६३ नविन बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १०६३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे. जळगावात कोरोनाचा उच्चांक गाठला आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १०६३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ३६९ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल एरंडोल ७७, रावेर १९, चाळीसगाव ८१, भुसावळ ३१, आणि मुक्ताईनगर २५, जामनेर ५०, जळगाव ग्रामीण ८४, अमळनरे ९९, चोपडा ६७, पाचोरा ४६, धरणगाव २२, पारोळा १७, बोदवळ १९, भळगाव ३१, यावल ११, इतर १५ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ३०७४९ इतका झालेला आहे. यातील २१८४५ रूग्ण बरे झाले आहेत. आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ८४९ इतकी  तर उपचार घेत असलेले ८०५५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!